भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा

nabhisthanin theva hrudayakamalin pahava | dvidalin anubhava ekabhava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥ अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥ प्रणव ओंकारू विचार करितां । बिंदुची तत्त्वतां सर्वगत ॥३॥ कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळीं पाहे आत्मरूप ॥४॥ भिन्नभिन्न नाहीं अवघेंचि स्वरुप । पाहतां निजरुप रुप होय ॥५॥ तेथें कैंचा विचारू कैंचा पा अनाचारू । एका जनार्दनीं साचारू सर्वा घटीं ॥६॥