भजनी मालिका
← भजनांकडे परत

न ये मनासी अभागिया गोष्टी । म्हणे बोलती चावटी बहु बोल

na ye manasi abhagiya goshti | mhane bolati chavati bahu bol

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न ये मनासी अभागिया गोष्टी । म्हणे बोलती चावटी बहु बोल ॥१॥ सांगतां सांगतां बुडतसे डोहीं । पुढीलाची सोई नेणती ते ॥२॥ वाचेसि स्मरण नाहीं कधी जाण । सदा मद्यपान बडबडतसे ॥३॥ एका जनार्दनीं नायके सांगतां । कोण याच्या हिता हित करीं ॥४॥