भजनी मालिका
← भजनांकडे परत

ना रुप ठसा निरालंब जाला

na rup thasa niralamb jala

रचनाकार: संत सोपान · अभंग
ना रुप ठसा निरालंब जाला । सगुणी उदेला तेजाकार ॥१॥ तेजरुप तेजी आरुप काजी । जीव शिव भोजी नांदताती ॥२॥ राहाते पाहाते जिवाचे पोखीते । आपणची उखीते दिसे एक ॥३॥ सोपानी नलगे प्रपंची वियोग । ब्रह्मार्पण भोग नुरे तोही ॥४॥