भजनी मालिका
← भजनांकडे परत

न माये ध्यानीं योगिया चिंतनीं । नाचतो कीर्तनीं संतापुढें

na maye dhyanin yogiya chintanin | nachato kirtanin santapudhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न माये ध्यानीं योगिया चिंतनीं । नाचतो कीर्तनीं संतापुढें ॥१॥ डोळियाची धणी फिटलीं पारणीं । उभा तो सज्जनीं पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं देखियेला डोळां । परब्रह्मा पुतळा बाईये वो ॥३॥