भजनी मालिका
← भजनांकडे परत

न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची

na mani sanmanachen koden | nahin chad vishayachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥१॥ ऐसें मज शरण येती । तयांचे उणें न पडे कल्पांती ॥२॥ नाहीं संसाराची चाड । नाहीं भीड कवणाची ॥३॥ एका त्याचा म्हणवी दास । धरुनी आस जनार्दनीं ॥४॥