भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करीं तळतळ मना । चिंती चरणां विठोबाचें

na karin talatal mana | chinti charanan vithobachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न करीं तळतळ मना । चिंती चरणां विठोबाचें ॥१॥ राहे क्षणभरी निवांत । न करीं मात दुजीं कांहीं ॥२॥ संतचरण वंदी माथां । तेणें सर्वथा सार्थक ॥३॥ एका जनार्दनीं मात । मना ऐकें तूं निवांत ॥४॥