भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनीं

na kari sayas anik sankalpa | vayanchi vikalpa na dhari manin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनीं ॥१॥ मनाचें जें मन करी ते स्वाधीन । तेणें नारायण कृपा करी ॥२॥ एका जनार्दनीं टाकूनि कल्पना । श्रीसंतचरणा शरण जाई ॥३॥