भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली बेडी प्रपंचाची

na kalechi mudha sukhachi ti godi | payin padali bedi prapanchachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली बेडी प्रपंचाची ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥ शुद्ध वैराग्याचा मानिती कंटाळा । पाळिती अमंगळा प्रपंचासी ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव खरा । तया त्या पामरा सांगुनी काय ॥४॥