भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें

na kale laghav taya magen dhanve | tayanche aikave vachan deven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें ॥१॥ देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागें धावें ॥२॥ गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरुप ॥३॥ सुखरुप बैसे वैकुंठींचा राव । भक्तांचा मनोभाव जणोनियां ॥४॥ जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दनी शरण जाऊं ॥५॥