भजनी मालिका
← भजनांकडे परत

न घालीं मी सांकडें । तुम्हां संसाराचें कोडें

na ghalin mi sankaden | tumhan sansarachen koden

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न घालीं मी सांकडें । तुम्हां संसाराचें कोडें ॥१॥ नामें गाईन आवडीं । पुढें नाचोनी बागडी ॥२॥ ध्यांईन मानसीं । रुप तुमचें अहर्निशीं ॥३॥ निळा म्हणे यावरि करा । कृपा रुक्‍मादेवीवरा ॥४॥