भजनी मालिका
← भजनांकडे परत

न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावें

na dhari laukikachi laj | tene sahaj namagaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावें ॥१॥ अनायासेंदेव हातां । साधन सर्वथा दुजे नाहीं ॥२॥ साधन तें खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावें ॥३॥ एका जनार्दनीं सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥