भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळीचे आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन

muliche ahe santavachan | namasmaranen tarati jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुळीचे आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन ॥१॥ तोचि आधार धरुनी पोटीं । बोलतों नेहटीं भाविकां ॥२॥ अवघ्या यातीसी उद्धार । न लगे श्रम करा नामोच्चार ॥३॥ एका जनार्दनीं पूर्वापार । नामाचा बडिवार बोलती ॥४॥