भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण

mul nashasi karan | kanak ani stri jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण ॥१॥ जो न गुंते येथें सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥ जया सुख इच्छा आहे । तेणें एकान्तासी रहावें ॥३॥ दृष्टी नाणी मनुष्यासी । तोचि परमार्थासी राशी ॥४॥ एका जनार्दनीं धन्य । त्याचा परमर्था पावन ॥५॥