भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळ डाळ बीजीं अवघे शाखा पल्लव । फळीं पुष्पीं विस्तारला परि तेंचि सर्व

mul dal bijin avaghe shakha pallav | phalin pushpin vistarala pari tenchi sarva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मूळ डाळ बीजीं अवघे शाखा पल्लव । फळीं पुष्पीं विस्तारला परि तेंचि सर्व ॥१॥ तैसा एक बीजरुप विटेवरी उभा । विश्वाकारें प्रगटला व्यापूनियां नभा ॥२॥ सर्वहि होऊनि देवो देवी आपणाचि सकळ । भूत व्यक्ति नाना वर्ण सूक्ष्म स्थूळ ॥३॥ निळां म्हणे एकाविण नाहीं दुसरें । एकीं एकपणही नुरे सेवटिलें मरे ॥४॥