भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास

muktichi to nahi chad | aise vad hari das

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास ॥१॥ मोक्षमुक्तिसी कोण पुसे । हें तों सरसें भांडवल ॥२॥ लक्ष्मीसहित देव नांदे । येरा विनोदें काय चाड ॥३॥ एका जनार्दनीं दास्य करी । मुक्ति तेथें फुका वरी ॥४॥