भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्ति येती धांवोनियां । प्रीती वरावया हरिभक्तां

mukti yeti dhanvoniyan | priti varavaya haribhaktan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मुक्ति येती धांवोनियां । प्रीती वरावया हरिभक्तां ॥१॥ रिध्दी सिध्दी वोळगे येती । समागम इच्छिती पुरुषार्थ ॥२॥ शांति क्षमा दया सिध्दी । सारिती उपाधी येऊनियां ॥३॥ निळा म्हणे निरहंकृती न ढळे परती नैराशा ॥४॥