भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती

muktapanen mukta shreshthapanen shreshtha | sarvatrin varishtha adishakti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥ जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥ अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥ लडिवाळ तान्हें एका जनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥