भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुगुट कुंडलें वनमाळा । केशर कस्तुरीचा टिळा

mugut kundalen vanamala | keshar kasturicha tila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मुगुट कुंडलें वनमाळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥१॥ विठो देखिला म्यां दिठीं । अंगीं चंदनाची उटी ॥२॥ जडित कंकणें मुद्रिका । कांसे पितांबर नेटका ॥३॥ कटीं मेखळा विराजे । वाकी किंकणी तोडर गाजे ॥४॥ मुखलावण्याची खाणी । जैसा चंद्र पूर्णपणीं ॥५॥ निळा म्हणे कटीं कर । अंगकाति मनोहर ॥६॥