भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृदु मधुर वाजवीत वेणु

mrudu madhur vajavit venu

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मृदु मधुर वाजवीत वेणु । सावळा नंदनु नंदाचा ॥१॥ तेणें गोपिका वेधल्या । पात्र झाल्या ब्रम्हसुखा ॥२॥ रंजवित्या विनोदवचनीं । हास्य करुनि हासवीतु ॥३॥ निळा म्हणे त्यांचिया गळां घाली वेळोवेळां करपल्लव ॥४॥