भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोकळा मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको

mokala marga pandharicha | nahin sadhan karanen sacha | yog abhyasacha | shramachi nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मोकळा मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको ॥१॥ जाय जाय पंढरपुरा । पाहे दीनांचा सोयरा । पुंडलिकें थारा । दिधला जाय आवडीं ॥२॥ तेथें करितां वसती । नाहीं तया पुनरावृत्ती । जन्ममृत्युची खंती न करी कांहीं ॥३॥ पावन तीर्थ महिवरी । समान या नाहीं दुसरी । एका जनार्दनीं निर्धारी । प्रेमे वारी करिती ॥४॥