भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिथ्या हा संसार । अवघा मायेचा बाजार

mithya ha sansar | avagha mayecha bajar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिथ्या हा संसार । अवघा मायेचा बाजार ॥१॥ स्त्रिया पत्रधन । हें तों सर्व मायिक जाण ॥२॥ यांत गुंतुं नको नरा । न करी आयुष्य मातेरा ॥३॥ वाचे वदे हरिहर । करी ध्यान निरंतर ॥४॥ एका जनार्दनीं नरा । नित्य भजे हरिहरा ॥५॥