भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग

miravoni dnyan pasariti dhong

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग । निंदिती राजयोग मुर्खपणें ॥१॥ तेचि निःसंशय जाणावे अभक्त । तारक एकचि सत्य राजयोग ॥२॥ गुरुचिया दाप्तां लेखिती सामान्य । नेणोनि प्रमाण संतांचे तें ॥३॥ सांगतीं मोळियां सर्वाचि श्रेष्ठ मार्ग । संती राजयोग वाळिया हें ॥४॥ तयांपाशी स्थीर नोहावें क्षणैक । नाशे अक्षयसुख तयां संगे ॥५॥ सद्भावें रिघावें शरण योगियांसी । द्यावा पायांपाशी बळी जीव ॥६॥ नेदी संप्रदाय नेम आचरण । नोहावें शरण ऐशां काहीं ॥७॥ ऐसियाचा संग झाल्या क्षण एक । त्याहुनी नसे पातक ब्रह्माडींहीं ॥८॥ ढळों नये कोणी केलियांही विघ्न । साधावें संपुर्ण याचि देहें ॥९॥ हणें जनार्दन सकळ याचिसाठी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥