भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा

milati sakalan gaulani te bala | laksha laviti dolan krushnamukha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥ आदरें गृहा नेती मुख पैं धृताती । जेवूं पै घालिती दहींभात ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाची पैं लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळें ॥४॥