भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तों संतांचें पोसणें । देती समयीं तेंचि खाणें

mi ton santanchen posanen | deti samayin tenchi khanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मी तों संतांचें पोसणें । देती समयीं तेंचि खाणें ॥१॥ अवघी चुकली जाचणी । उण्यापुयाची सोसणी ॥२॥ करुं सांगितलें काज । चिंता दवडूनियां लाज ॥३॥ निळा म्हणे फिटली खंती । जिणें मरणें त्यांचे हातीं ॥४॥