भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तो स्वयें परब्रह्मा । मीचि स्वयें आत्माराम

mi to svayen parabrahma | michi svayen atmaram

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी तो स्वयें परब्रह्मा । मीचि स्वयें आत्माराम ॥१॥ मी तों असे निरुपाधी । मज नाहीं आधिव्याधी ॥२॥ मी तों एकट एकला । द्वैतभाव मावळला ॥३॥ मजविण नाहीं कोणीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥