भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं

mi majhen ani tujhen | taki paraten hen vojhen | namen pavan hosi sahajen | tenchi sevin avadin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं ॥१॥ नको गुंतूं या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥ देई टाकुनी लवलाही । रामनाम सुखें गाईं । एका जनार्दना पायीं । तरी सुखा काय उणें ॥३॥