भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनियां विटलें मन । आलें परतोन माघारिया

mhanoniyan vitalen man | alen paraton maghariya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणोनियां विटलें मन । आलें परतोन माघारिया ॥१॥ तुमचिया नामस्मरणीं । रतलें चरणी सुखावलें ॥२॥ नाहीं येथे घातपात । पावती निभ्रांत निजठायां ॥३॥ निळा म्हणे ऐसिया आशा । राहिलें भरंवसा मानू‍नियां ॥४॥