भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनियां संतजनां । देती आलिंगना पूजिती

mhanoniyan santajanan | deti alingana pujiti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणोनियां संतजनां । देती आलिंगना पूजिती ॥१॥ त्यांचियां मुखें ऐकती कथा । मानिती परमार्था फळ आलें ॥२॥ म्हणती आजी धन्य झालों । प्रसाद पावलों संतांचा ॥३॥ निळा म्हणे उत्साह देवा । मानला वैभवा देखोनियां ॥४॥