भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी

mhane namayasi kshan ek na pahatan | hoy majhya chitta kasavishi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥ तुमचा पुत्र तुम्हांसी जैसा प्रिय । तैसा मज होय नामदेव ॥२॥ क्षणोक्षणीं येणें पुरविली पाठी । लाविली लंगोटी आम्हांलागीं ॥३॥ एका जनार्दनीं वारितां नायके । येऊनियां सुखें बैसतो घरीं ॥४॥