भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितों दास । तरी सांभाळी ब्रिदास

mhanaviton das | tari sambhali bridas

रचनाकार: संत सेना · अभंग
म्हणवितों दास । तरी सांभाळी ब्रिदास ॥१॥ शुद्ध नाहीं भाव। तूं जाणशी पंढरीराव ॥२॥ केलेंसे जतन। धोकटी आरसाची जाण ॥३॥ करितो व्यवसाव। माझ्या जातीचा स्वभाव ॥४॥ सेनां करितो विनवणी । हात जोडूनिया दोन्ही॥५॥