भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणविते शरणांगत । कोणाचे भक्त देवावीण

mhanavite sharanangat | konache bhakta devavin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणविते शरणांगत । कोणाचे भक्त देवावीण ॥१॥ कोणापाशीं हा परिहार । देते संसार यातनेचा ॥२॥ कोण देवाविण येते । भक्तांसी सोडविते भयांतुनी ॥३॥ निळा म्हणे देव आणि भक्त । येरेयेरा होत साह्य सदा ॥४॥