भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणविलों विठोबाचा दास। शरण जाईन संतांस

mhanavilon vithobacha das| sharan jain santans

रचनाकार: संत सेना · अभंग
म्हणविलों विठोबाचा दास। शरण जाईन संतांस ॥ १॥ सदा सुकाळ प्रेमाचा। नासे दुष्ट मळ बुद्धीचा ॥२॥ ऐकतां हरीचें कीर्तन। अभक्त भक्ति लागे जाण ॥३॥ उभा राहे कीर्तनांत। हर्षे डुले पंढरिनाथ ॥४॥ सेना म्हणे हेंचि सुख । नाहीं ब्रह्मयासि देख ॥५॥