भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती कृष्ण आवडे कैसा । जीवप्राण का पढिये जैसा । एकी म्हणती गे मानसा । भुलवाणाचि सुंदरपणें

mhanati krushna avade kaisa | jivapran ka padhiye jaisa | eki mhanati ge manasa | bhulavanachi sundarapanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणती कृष्ण आवडे कैसा । जीवप्राण का पढिये जैसा । एकी म्हणती गे मानसा । भुलवाणाचि सुंदरपणें ॥१॥ यातें पाहों जातां दिठी । पहाते पहाणेंचि नुरें शेवटीं । संचरोनियां हा पाठीपोटीं । करी आपणासारिखें ॥२॥ वेधूचि लावियेला मना । येणें गोविलें वो लोचना । आमुच्या चित्ताचिया वासना । येणेंचि हिरोनियां घेतल्या ॥३॥ वाटे तयासीचि परिचार । करुनी असावें निरंतर । क्षणही एक न व्हावा दूर । माया माहेर आमुचा हा ॥४॥ विनोद चर्चा याशींच करणें । आवडे कृष्णासीं बोलणें । यावीण दुजें दृष्टी । नावडो याविण आणिकी गोष्टी । विश्रवा आधीं हा शेवटीं । पाहावा पोटीं हेंचि आवस्था ॥६॥ निळा म्हणे ऐशीं कृष्णें । हिरोनी घेतलि यांचि मनें । मग या राजीवलोचनें । मांडिली विंदानें आणिकही ॥७॥