भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणसी दावीन अवस्था । तैसें नकोरे अनंता

mhanasi davin avastha | taisen nakore ananta

म्हणसी दावीन अवस्था । तैसें नकोरे अनंता ॥१॥ होऊनियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥२॥ मृगजळाचियापरी । तैसें न करावें हरी ॥३॥ तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्मात्कारी ॥४॥