भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हैस वेलि देतां सेलि होंसि कासाविस । येईल पुढें थेटे पडसें आयुष्याचा नाश

mhais veli detan seli honsi kasavis | yeil pudhen thete padasen ayushyacha nash

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हैस वेलि देतां सेलि होंसि कासाविस । येईल पुढें थेटे पडसें आयुष्याचा नाश ॥१॥ बुड हरि सवें । देहभाव उरनिभावें ॥२॥ दरडिवरी राहोनि उभा मारिसी किराणें । तळींचा धोंडा नेणोनि पोरा जाशील जिवें प्राणें ॥३॥ म्हणे निळा सांडूनि खेळा श्रीहरीतें भज । आक्षोम जळ न चले बळ होशील निर्बुज ॥४॥