भजनी मालिका
← भजनांकडे परत

माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली

maye adhin lek janmali | doghinchya lagnachi ayati keli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥ कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥ बापा आधीं लेक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥ वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनीं जाहली नवलपरी ॥४॥