भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी

mayabap majha soyara jivalag | tunchi pandurang majalagi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥ माझियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण मायबाप ॥२॥ म्हणोनियां डोई ठेवियेली पायीं । प्रेमभरित पाहीं नामा जाहला ॥३॥ एका जनार्दनीं देवाचा एकुलता । नामयापरता कोणी नाहीं ॥४॥