भजनी मालिका
← भजनांकडे परत

मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा

mati majhi lago sopanacharanin | ratrandivas chintani jap sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥ आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥ वेदशास्त्रें भांडती ज्यालागीं कोडें । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥ प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥ करुनी सोहळा समाधीं बैसविला । एका जनार्दनीं राहिला पुढें मागे ॥५॥