भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेच्या कैवारा सहस्त्रार्जुन वधी । एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय शोधी

matechya kaivara sahastrarjun vadhi | ekavis velan pruthvi ni:kshatriy shodhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातेच्या कैवारा सहस्त्रार्जुन वधी । एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय शोधी ॥१॥ तोचि मायबाप चंद्रभागेतीरीं । कर कटावरी ठेउनी उभा ॥२॥ एका जनार्दनीं ज्याची कीर्ति वर्णितां । द्वैत हारपलें ममता देशधडी चिंता ॥३॥