भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनीं सदा

matecha athav balavari sneho | taisa dhara devo manin sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनीं सदा ॥१॥ बाळा पाहूनियां माता संतोषत । तैसा धरा हेत देवावरी ॥२॥ बोबडें साबडें असोत तें बाळ । तैसा धरा कळवळ देवावरी ॥३॥ एका जनार्दनीं देव धरा मनीं । आसनीं शयनीं विसरूं नका ॥४॥