भजनी मालिका
← भजनांकडे परत

माते बळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विंदानी । आम्हां जळतजळतां वनीं । येणें रक्षिले निमिषाधें

mate baliya shiromani | krushna natak ha vindani | amhan jalatajalatan vanin | yenen rakshile nimishadhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माते बळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विंदानी । आम्हां जळतजळतां वनीं । येणें रक्षिले निमिषाधें ॥१॥ आम्हां जाळित आला ओणवा । विराटरुपी हा झाला तेव्हां । मुखचि पसरुनीयां अघवा । प्राशन केला दावानळ ॥२॥ आम्हीं देखिलें तें नयनीं । दिव्य रुप याचें अवघ्या जणीं । ऐसें ऐकोनियां ते जननी । परम आश्रचर्यातें पावलीं ॥३॥ घरोघरीं हेचि वार्ता । विस्तारली गोवळ सांगतां । एक म्हणती हो श्रीअनंता छ न म्हणावें मानव यावरी ॥४॥ जे जे याचे अचाट खेळ । देखिले ऐकिले तुम्हीं ते सकळ । कृष्ण हा परमात्मा केवळ । आम्हीं मानुं आपुलाचि ॥५॥ सकळांतरी याचा वास । वसविले ते येणेंचि देश । याविण रिताचि अवकाश । न दिसे कोठेंही धुडितां ॥६॥ निळा म्हणे प्रतीत ऐशी । बाणली गोवळां आदि सकळांसी । मग ते तयातेंचि मानसी । ध्याती पूजिती सर्वदा ॥७॥