भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातापिता समर्थ । स्वामी माझा एकनाथ

matapita samartha | svami majha ekanath

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मातापिता समर्थ । स्वामी माझा एकनाथ ॥१॥ काळ रुळतो चरणी । देवघरी वाहे पाणी ॥२॥ ज्यांचे अनुग्रहे करुन । झालो पतित पावन ॥३॥ जो वसे प्रतिष्ठानी । निळा त्यासी लोटांगणी ॥४॥