भजनी मालिका
← भजनांकडे परत

मर्कटासी मदिरा पाजिली । तैशी भुलली विषयांसी

markatasi madira pajili | taishi bhulali vishayansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मर्कटासी मदिरा पाजिली । तैशी भुलली विषयांसी ॥१॥ मातला गज नावरे जैसा । विषय फांसा त्यावरी ॥२॥ रेडा जैसा मुसमुशी । तैसा लोकांसी बोलत ॥३॥ श्वाना जैसे पडती किडे । तैसा चहुकडे रेडे ॥४॥ शरण एका जनार्दनीं । अंतीं यमाची जांचणी ॥५॥