भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम

marga sopa pandharicha | sampadala sacha uttam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम ॥१॥ नाहीं पुसायाचें काम । वाचें नाम मुखीं गाऊं ॥२॥ नाहीं कोठें आडकाठी । साधनकपाटीं पंचाग्र ॥३॥ नलगे योगयाग तप । वाचे जप विठ्ठल ॥४॥ त्रिअक्षराचें काम । एका निष्काम जनार्दनीं ॥५॥