भजनी मालिका
← भजनांकडे परत

मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवीं निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा

marduni shankhasura haten vagavisi kalivara | tevin nivatoni ahankara | majhya vagavishi sharira

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवीं निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा ॥१॥ येथें नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवे देवो ॥२॥ शंख वाजविशी नाना स्वरा । तें तंव न बाधी शंखासुरा ॥३॥ तैसी चेतउनी माझी गिरा । बोली बोलविता तूं खरा ॥४॥ कर्म कार्य कर्तव्यता । माझेनि नांवें तूंचि आतां ॥५॥ एका जनार्दनीं निजात्मता । कर्म करून नित्य अर्कता ॥६॥