भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण

manushya dehin vhaven brahmadnyan | gheto pudhilen amantran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥ पुढें जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥ चौर्‍यांयशीं लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥ ऐसा मनुष्यदेह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥ होतां विषयीं वासना । नाठवीची एका जनार्दना ॥५॥