भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनींचा माझिया वो संदेह फिटला । देव पाहों जातां जवळींच भेटला । अवघा मागें पुढें तोचि वो ठाकला । जनीं जनार्दन भरोनियां दाटला वो

manincha majhiya vo sandeh phitala | dev pahon jatan javalinch bhetala | avagha magen pudhen tochi vo thakala | janin janardan bharoniyan datala vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मनींचा माझिया वो संदेह फिटला । देव पाहों जातां जवळींच भेटला । अवघा मागें पुढें तोचि वो ठाकला । जनीं जनार्दन भरोनियां दाटला वो ॥१॥ पुरलें जीवींचे आर्त साजणी । पाहें जेथें तेथें दिसे चक्रपाणी । लोकलोकांतरी त्याचीचि भरणी । भरोनि उरला अवघ्याचि वाणी खाणी वो ॥२॥ झाला सुकाळ हा सुखाचा मानसा । पडिला त्रिभुवनीं एकरुप ठसा । धरा व्यापूनियां अंबर दशदिशा । आतां भोगीन मी सर्वकाळ ऐसा वो ॥३॥ नाना भूताकृति एकचि आभासे । नाना नामें आळवितां वो देतसे । नाना अळंकार एकचि लेतसे । नागिवा उघडाही बरवाची दिसे वो ॥४॥ नाना वस्त्रें हा नेसला पांघुरला । जेथील तेथेंचि हा बहुरंगें नटला । शस्त्रें अशस्त्रे हा हातें मिरवला । सौम्य क्रूर ऐसा होऊनियां राहिला वो ॥५॥ एका निववी भोगवी नाना भोग । एका खाववी जेववी दावी जग । एका विचरे देऊनि अंगसंग । निळा म्हणे हा एकलाचि अनंग वो ॥६॥