भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनें कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या

manen kalponiyan keli vitambana | hindavile ranan vasanechya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनें कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥ तैसें नका करूं वाउगें चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥ मनाचें आकलन करावें पां आधीं । वाउगी उपाधी तुटतसे ॥३॥ एका जनार्दनीं आवरुनी मन । मग करीं भजन सुखरूप ॥४॥