भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान

man manasi hoy prasanna | tevhan vrutti hoy nirabhiman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ॥१॥ पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥ साधकें संपुर्ण । मन आवरावें जाण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मनें होय समाधान ॥४॥