भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन करूनियां स्थिर । हृदयीं ध्याई तो साचार

man karuniyan sthir | hrudayin dhyai to sachar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मन करूनियां स्थिर । हृदयीं ध्याई तो साचार ॥१॥ मग सुखाची वसती । सदा समाधान चित्तीं ॥२॥ समाधि समाधान । सहज घडे ब्रह्माज्ञान ॥३॥ तुटे संसाराचा कंद । वाचा नामस्मरण छंद ॥४॥ हेंचि साधनांचें सार । सदा चित्तीं परोपकार ॥५॥ एका जनार्दनीं ध्यानक । ध्यानीं मनीं जनार्दन ॥६॥